शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच...!
By Admin | Updated: August 8, 2016 00:39 IST2016-08-08T00:31:49+5:302016-08-08T00:39:13+5:30
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी भाजीपाला उत्पादकांची जादा भाव मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच...!
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी भाजीपाला उत्पादकांची जादा भाव मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचे चित्र आहे.
आडत पट्टी वसुलीवरून दहा ते बारा दिवस समितीतील खरेदी विक्री बंद होती. काही दिवस शेतकऱ्यांनी थेट भाजीपाल्याची विक्री केली. आता संप मिटल्याने भाजीपाला विक्री पूर्ववत झाली असली तरी कमिशन तसेच शेतकऱ्यांची पहिल्यासारखीच लूट होत आहे. दहा टक्के कमिशनपैकी हमालीचे दोन टक्के कमिशन घेतले जाते.
मात्र, काही भाजीपाला व्यापारी शेतकरी व खरेदीदार यांच्याकडून जादा भाव देण्याचे आमिष दाखवून रक्कम उकाळत असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जालना बाजार समितीत परिसरातील ४० खेड्यातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. शेतकरीही जादा भाव मिळेल म्हणून व्यापाऱ्यांना काही रक्कम देण्याचे आश्वासन देतात. असे असले तरी काही व्यापारी तुमचा माल कच्चा आहे, दर्जा चांगला नाही म्हणून शेतकऱ्यांना भीती दाखवतात. जास्त भाव पाहिजे असेल तर एवढे कमिशन द्या, असा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हमाली वगळता इतर कोणतेही पैसे देऊ नये असे असतानाही काही व्यापारी शेतकऱ्यांचा गैर फायदा घेत आहेत. व्यापारी प्रति शेतकऱ्यांनी शंभर ते पन्नास रूपये कमिशन उकळत असल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, बुधवारी जवाहर बाग परिसरात तर रविवारी गांधी चमन भागात भाजीपाला बाजार भरत असल्याने शेतकरी थेट येथे मालाची विक्री करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना जादा कमिशन देण्याचा प्रयत्न नसल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कमिशन देऊ नये, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)