‘कृषी संजीवनी’कडे शेतकऱ्यांची पाठ !

By Admin | Updated: September 26, 2014 01:20 IST2014-09-26T01:01:10+5:302014-09-26T01:20:23+5:30

कळंब : कृषी पंपाची थकीत वीजबिले वसूल व्हावीत, यासाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या ‘कृषी संजीवनी’ योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे़

Farmers' education to Krishi Sanjivani! | ‘कृषी संजीवनी’कडे शेतकऱ्यांची पाठ !

‘कृषी संजीवनी’कडे शेतकऱ्यांची पाठ !


कळंब : कृषी पंपाची थकीत वीजबिले वसूल व्हावीत, यासाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या ‘कृषी संजीवनी’ योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे़ तालुक्यातील केवळ ७५६ शेतकऱ्यांनी ३७ लाख ७५ हजार रूपयांचा भरणा केला असून, तब्बल २८ कोटी, ८८ लाख रूपये कृषी पंपाची थकबाकी जैसे थे आहे़
तालुक्यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतात सिंचनासाठी वीज कंपनीची विज वापरतो़ यासाठी वापरात असलेल्या कृषीपंपाचे देयक भरण्यासाठी अनियमित निसर्गचक्रामुळे शेतकरी मेटाकुटीला येतात़ परिणामी शेतकऱ्यांवरील वीज कंपनीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत जात आहे़ यावर व्याज व दंड आकारला जात असल्याने मूळ रक्कमेसोबतच देयकाच्या रक्कमेचाही आकडा फुगतो़ शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी असल्याने वीजबिले थकली जातात़ शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा डोंगर पाहता शासनाने जून महिन्यात कृषी पंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलात सूट देत नवी कृषी संजीवनी योजना लागू केली आहे़ तालुक्यातील केवळ ७५६ लाभधारक शेतकऱ्यांनीच या योजनेचा लाभ घेत ३७ लाख ७५ हजार रूपयांची थकबाकी वीज कंपनीकडे भरली असून, इतरांनी मात्र, या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे़ (वार्ताहर)

Web Title: Farmers' education to Krishi Sanjivani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.