शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

By Admin | Updated: April 3, 2015 00:40 IST2015-04-03T00:28:28+5:302015-04-03T00:40:13+5:30

चाकूर : चाकूर विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे यांच्या शेतकरी विकास

Farmer's development panel dominates | शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व


चाकूर : चाकूर विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे यांच्या शेतकरी विकास पॅनलने १३ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. विरोधकांना एकही जागा मिळविता आली नाही.
गुरुवारी रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. चाकूरची सोसायटी गेल्या २३ वर्षांपासून माकणे यांच्या ताब्यात आहे. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व विठ्ठलराव माकणे यांनी तर बळीराजा लोकशाही विकास पॅनलचे नेतृत्व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास पाटील यांनी केले. त्यामुळे ही निवडणीक प्रतिष्ठेची झाली होती.
१३ जागांसाठी २७ जण रिंगणात होते. यात विठ्ठलराव माकणे, सत्यविजय कुलकर्णी, माधव नरवटे, गुलाबखाँ पठाण, शिरीष रेड्डी, गोविंद वाघ, नरेंद्र शेटे, संजयकुमार शेटे, सुमनबाई फुलारी, सुरेखा येरनाळे, रामराव राठोड, शिवानंद स्वामी, प्रभाकर तलवारे हे विजयी झाले आहेत.
सोसायटीच्या या निवडणुकीत २७२३ सभासदांपैकी २४२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गजेंद्र देशमुख, तर सहाय्यक म्हणून एच.व्ही. हरिदास यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

Web Title: Farmer's development panel dominates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.