शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
By Admin | Updated: March 26, 2015 00:54 IST2015-03-26T00:43:13+5:302015-03-26T00:54:49+5:30
राजूर : भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथे झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उपसरपंच रामेश्वर पडोळ व गुलाबराव भालेराव यांच्या शेतकरी

शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
राजूर : भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथे झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उपसरपंच रामेश्वर पडोळ व गुलाबराव भालेराव यांच्या शेतकरी विकास पॅनलने तेरा पैकी तेरा जागांवर विजय मिळवून एकतर्फी वर्चस्व मिळविले आहे.
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत रामेश्वर पडोळ व गुलाबराव भालेराव यांचे शेतकरी विकास पॅनल तर सोमीनाथ रेवगडे व दीपक पडोळ यांचे परिवर्तन पॅनल आमने सामने होते. या निवडणुकीत एक जागा यापूर्वीच बिनविरोध काढण्यात आली. बारा जागेसाठी मतदान होऊन निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे बाराही उमेदवार मोठया फरकाने विजयी होऊन सोसायटीवर एकतफी वर्चस्व मिळविले.
विजयी उमेदवारांत गुलाबराव भालेराव, रूपसिंंग जाखड, विष्णू भालेराव, देवकरण पडोळ, रामेश्वर पडोळ, आसाराम रेवगडे, गुलाबराव रेवगडे, मिलींद गंगावणे, उमाकांत नसवाले, श्रीमती हरणाबाई भालेराव, श्रीमती सत्यभामाबाई जाधव यांचा समावेश आहे तर सुखदेव घोलत हे बिनविरोध विजयी झाले होते. निवडणुकीचा निकाल अध्याशी अधिकारी घुसिंंगे यांनी जाहीर केला. त्यांना सोनवणे यांनी सहकार्य केले.
गेल्या अठरा वर्षांपासून बाणेगाव सोसायटीची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकान सोसायटीला जोडलेले असल्याने दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी सोसायटी ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
उपसरपंच रामेश्वर पडोळ यांच्या गटाचे असलेले विद्यामान चेअरमन सोमीनाथ रेवगडे हे ऐनवेळी विरोधी गटात सामील झाल्याने निवडणूक रंगतदार झाली होती.
येथील ग्रामपंचायत निवडणुक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असून सोसायटीची निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीची नांदी ठरली होती. त्यामुळे दोन्ही गटाने प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. (वार्ताहर)