दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:11+5:302020-12-04T04:08:11+5:30
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी व शेलगाव ३३ के.व्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना रात्र व दिवसपाळीत वीज पुरवठा करण्यात ...

दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी व शेलगाव ३३ के.व्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना रात्र व दिवसपाळीत वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर हिंसक वन्य प्राण्यांकडून हल्ले होत आहेत. तसेच थंडीचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करावा, अशी मागणी नासेर कालू पटेल यांनी केली आहे.