भाव पाडल्याने शेतकºयांनी हिसकावले काटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:29 IST2017-09-09T00:29:05+5:302017-09-09T00:29:05+5:30

कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील आठवडी बाजारात मूग, उडदाचे भाव आठशे रुपयांपर्यंत पाडल्याने संतप्त शेतकºयांनी भुसार बाजार बंद पाडून व्यापाºयांचे वजन काटे हस्तगत करून दिवसभर बाजार बंद ठेवला.

The farmers cut off the price and cut them off | भाव पाडल्याने शेतकºयांनी हिसकावले काटे

भाव पाडल्याने शेतकºयांनी हिसकावले काटे

लोकमत न्यूज नेटवर्क
पोत्रा : कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील आठवडी बाजारात मूग, उडदाचे भाव आठशे रुपयांपर्यंत पाडल्याने संतप्त शेतकºयांनी भुसार बाजार बंद पाडून व्यापाºयांचे वजन काटे हस्तगत करून दिवसभर बाजार बंद ठेवला.
बोल्डा येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. यात हिंगोली, आखाडा बाळापूर, कन्हेरगाव नाका, वसमत, शिरड अशा लांबवरून भुसार व्यापारी मालाची खरेदी करण्यास येतात. आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही उपबाजारपेठ आहे. ८ सप्टेंबर रोजी शेतकºयांनी मूग, उडीद विकायला आणले. तेव्हा मुगाला आठशे ते तीन हजार तर उडदाला आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव व्यापारी देत होते. यावरून शेतकरी संतापले. त्यांनी सिंदगी परिसरातील पोत्रा, येहळेगाव, गवळी, आसोला यासह अन्य गावातील शेतकरी जमा करून लूट करणाºया जवळपास व्यापाºयांचे काटे हस्तगत करून जमा केले. विशेष म्हणजे बाजार समितीने कोणत्याही व्यापाºयाला पावती बुक दिले नाही. त्यामुळे शेतकºयाला तशी पावती मिळत नाही. मटक्याच्या आकड्याच्या पावत्यासारख्या चिठ्ठ्या शेतकºयांना दिल्या जातात. या शिवाय बहुतांश व्यापाºयांकडे परवाना नाही. बाजार समितीचे कर्मचारी केवळ उखळ पांढरे करून घेण्यापुरती हजेरी लावतात. शेतकºयांचे नुकसान होत असल्याचे कोणालाही सोयरसूतक नाही. विशेष म्हणजे व्यापारी मालाला भावही कमी देतात. मालाच्या २०० ग्रॅमच्या पोत्यासाठी एक किलोची कटी कापतात, असे मत सिंदगीचे शेतकरी रमेश दत्तराव मगर यांनी व्यक्त केले. शिवाय ५०० ग्रॅम वजन जास्त झाले तरी व्यापारी त्याचे मोजमाप पकडत नाहीत. विशेष म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून शेतकºयांनी भुसार बाजार बंद ठेवला होता. फक्त भाजीपाला, कपडा, किराणा बाजार चालू होता. पं.स. सदस्य संजय मंदाडे, भाजयु मोर्चाचे विद्याधर मगर यांनी शेतकºयांची बाजू घेतली. यावेळी अमोल मंदाडे, कल्याण मगर, ओमकार सुर्यवंशी, नंदकुमार मंदाडे, पंकज मंदाडे, मुन्ना मगर, सुरेश सूर्यवंशी, चंद्रकांत मगर, नवनाथ सूर्यवंशी, माजिद सय्यद, संतोष मस्के आदींसह शेकडो युवा शेतकºयांनी व्यापाºयांचे वजन काटे हस्तगत करून दिवसभर भुसार बाजार बंद ठेवला. शेवटी कळमनुरी सहाय्यक निबंधक किरण चौधरी यांनी वेळीच धाव घेवून शेतकरी आणि व्यापाºयांची बैठक घेवून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सध्या मुगाला ५५७५ रुपये व उडदाला ५४०० रुपये हमी भाव आहे. हमी भावाप्रमाणे माल खरेदी करा, म्हणून चौधरी यांनी व्यापाºयांना फटकारले. ज्या शेतकºयांना कमी भाव मिळाला त्यांना त्या व्यापाºयाने उर्वरित रक्कम द्यावी, असा तोडगा काढून प्रकरणाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीवर कार्यवाही करा म्हणून मागणीवर जोर देत होते.

Web Title: The farmers cut off the price and cut them off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.