सोयाबीन अनुदान प्रस्तावासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी

By Admin | Updated: January 28, 2017 23:43 IST2017-01-28T23:39:49+5:302017-01-28T23:43:01+5:30

लातूर :च्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्ताव सादर करण्याच्या शनिवारी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़

Farmers' crowds in the market committee for soybean subsidy offer | सोयाबीन अनुदान प्रस्तावासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी

सोयाबीन अनुदान प्रस्तावासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी

लातूर : बाजार समितीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रति क्विं़ २०० रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर करुन २८ जानेवारी ही शेवटची मुदत दिली होती़ त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्ताव सादर करण्याच्या शनिवारी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़ शनिवारपर्यंत जवळपास २४ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले आहेत़
१ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विं़ २०० रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे़ त्याचा लाभ २५ क्विं़पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे़ शासनाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली होती़
दरम्यान, प्रजासत्ताकदिन व अमावस्येची सुटी आल्याने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य बाजार समित्यांनी या अनुदानाच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नयेत, म्हणून या सुटीच्या दिवशीही प्रस्ताव घेणे सुरु ठेवले होते़ लातूर बाजार समितीत बुधवारपर्यंत १५ हजार प्रस्ताव दाखल झाले होते़ शनिवारी अखेरच्या दिवशीपर्यंत जवळपास २४ हजार शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत़ शनिवारी तर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती़ त्यामुळे एकाच दिवसात ४७५० प्रस्ताव दाखल झाल्याचे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले़

Web Title: Farmers' crowds in the market committee for soybean subsidy offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.