कृषी सहायकाविरुद्ध शेतकऱ्यांची तक्रार
By Admin | Updated: August 7, 2014 01:45 IST2014-08-07T00:40:56+5:302014-08-07T01:45:17+5:30
गंगामसला: माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील कृषी मंडळात कार्यरत असलेले कृषी सहायक यांनी मोठेवाडी गावातील सुमारे शंभरहून अधिक

कृषी सहायकाविरुद्ध शेतकऱ्यांची तक्रार
गंगामसला: माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील कृषी मंडळात कार्यरत असलेले कृषी सहायक यांनी मोठेवाडी गावातील सुमारे शंभरहून अधिक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १५०० रुपये पेरणीसाठी बियाणे आणून देतो म्हणून घेतले. मात्र अद्यापही बियाणे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सहायक कृषी अधिकाऱ्याबद्दल तक्रार केली आहे.
गंगामसला येथे कृषी मंडळ असून, येथे कृषी सहायक आर.जे. शेख हे काम पाहतात. शेख यांनी मोठेवाडीतील सुमारे शंभराहून अधिक शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी सोयाबीनचे बियाणे आणून देतो म्हणून प्रत्येकी १५०० रु. घेतले. शेख यांनी बियाणे तर नाहीच परंतु पैसेसुद्धा परत दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात होता. शेतकऱ्यांचे पैसे लाटणाऱ्या शेख यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे मोठेवाडीच्या शेतकऱ्यांनी केली आहे. शेख यांना दिलेली रक्कम परत द्यावी व शेख यांच्यावर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. डीवायएफचे अध्यक्ष राम साळवे, पप्पू हिवरकर, भगवान पवार, श्रीकृष्ण मोरे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तालुका कृषी अधिकारी सी.आर. देशमाने म्हणाले, शेख यांची चौकशी करुन सर्व शेतकऱ्यांचे पैसे परत देण्यात येतील, तक्रारींची दखल घेतली जाईल. (वार्ताहर)