फळबागाला शेततळ्याचा आधार
By Admin | Updated: June 18, 2016 00:49 IST2016-06-18T00:37:33+5:302016-06-18T00:49:26+5:30
टेंभूर्णी : एकीकडे दुष्काळामुळे तालुक्यातील फळबागा नष्ट होत असताना दुसरीकडे मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा, जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आहे.

फळबागाला शेततळ्याचा आधार
टेंभूर्णी : एकीकडे दुष्काळामुळे तालुक्यातील फळबागा नष्ट होत असताना दुसरीकडे मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा, जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आहे. त्या पाण्याचे योग्य पद्धतीने चांगले नियोजन करून दुष्काळामध्ये डाळींब व आंबा या फळबागांना शेततळ्याचा आधार मिळाल्याने गणेशपूर येथील शेतकरी नितीन माधोराव अंधारे, अरूण माधोराव अंधारे, अनिल माधोराव अंधारे यांना फळबागेतून लाखो रुपयांची उत्पन्न मिळाले आहे.
गणेशपूर येथील शेतकरी अंधारे या तीन बंधुंनी २०१२ मध्ये कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन रोहयो योजनेतून फळबाग लागवड केली. यामध्ये डाळींबाची १ हजार झाडे तर अंब्याची साडेपाचशे झाडे लावली. फळबागांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून २०१२ मध्येच एक एकरचा ३५ बाय ३५ चे शेततळे उभारले. हे शेततळे पावसाळ्यात तुडूंब भरायचे. फक्त फळबागेसाठीच ठिबकच्या साह्याने पाणी, खते, औषधी दिले. दुष्काळामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडांच्या खोडाजवळ मल्चिंग करून सकाळी एक वेळेस व रात्रीला पाणी देण्यात आले.
या सर्व फळबागांना सेंद्रीय खताचा वापर करण्यात आला. त्यामुळे फळबाग रोगमुक्त आहे. सेंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या फळबागेतून डाळींब जवळपास साडेतीन लाख केशर आंबा, अडीच लाख रुपये उत्पन्न दिले आहे. परिसरातील या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन सेंद्रीय शेती करावी, उत्पन्न हमखास मिळते, या फळबागेसाठी गांडूळ प्रकल्प उभारला असून, या खताचा मोठा वापर करत असल्याने फळांचा दर्जा सुद्धा चांगला असल्याने भाव मिळत असल्याचे शेतकरी नितीन अंधारे यांनी सांगितले. (वार्ताहर)