पावसाने दडी मारल्याने शेतकºयांची चिंंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:54 IST2017-08-09T23:54:33+5:302017-08-09T23:54:33+5:30
भोकरदन तालुक्यात पंधरा ते वीस दिवसांपासुन पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंंता वाढली आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकºयांची चिंंता वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन तालुक्यात पंधरा ते वीस दिवसांपासुन पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंंता वाढली आहे. या पावसाचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून कृषीशी संबधित बाजारपेठेत अक्षरश: शुकशुकाट दिसत आहे़
तालुक्यात सुरूवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची लागवड मृग नक्षत्रात करण्यात आली. त्यामुळे शेतकरी सुरूवातीला समाधानी होता. कारण मराठवाड्यात सर्वाधिक चांगली परिस्थिती भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात होती. त्यामुळे शेतकºयांनी पिकांसाठी लागणारा सर्व खर्च केला पीके सुध्दा चांगली जोमात असल्यामुळे शेतीतून निघणाºया उत्पादनाचे आकडेमोड शेतकरी करू लागले होते. परंतु, दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकºयांनी केलेला खर्च सुध्दा वाया गेला आहे.
काही ठिकाणी मका हे पीक केवळ जनावरासाठी चारा म्हणून उपयोगात येणार आहे. तर सोयाबीन फुलोºयात असताना जागेवरच करपून जात आहे. मूग, उडीद या पिकेसुद्धा अशाच स्थितीत आहेत. केवळ मिरची व कपाशीचे पीक सध्या शेतात तग धरून उभे आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर कपाशीचे पीकदेखील हातचे जाईल, असे चित्र आहे.
तालुक्यातील राजूर, हसणाबाद, तळेगाव, पिंपळगाव कोलते, रजाळा, निमगाव, मुठाड, कुंभारी, इब्राहिमपूर, आव्हाणा, मालखेडा, भोकरदन, सोयगाव देवी, केदारखेडा, सिपोरा बजार, दानापूर, वडशेद, देहेड, वाकडी, आन्वा, जळगाव सपकाळ, धावडा, वालसांवगी, पिपळगाव रेणुकाई, पारध या भागातील पीकानी माना टाकल्या आहेत.
जलयुक्त शिवार योजनेची ज्या भागात कामे करण्यात आली व त्या गावाच्या परिसरात शेतकºयांच्या विहिरींचा पाणीसाठा चांगला आहे. या पाण्याच्या आधारावर शेतकरी आपली पिके जगवीत आहेत.
बाजारपेठावर मोठा परिणाम
तालुक्यातील व्यापार हा केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तर व्यापारी सुखी अशी सांगड ग्रामीण भागात आहे.
गेल्या वीस दिवसापासून शेतकºयांनी होते नव्हते ते शेतात टाकून दिले. शिवाय पुढे काही हातात येईल यांची गॅरंटी नसल्यामुळे शेतकºयांनी आखडता हात घेत खरेदी बंद केली आहे.
त्यामुळे तालुक्यातील सर्वच बाजारपेठा ओस पडल्या आहेत. कृषी सेवा केंद्रावर या दिवसामध्ये गर्दी असायची आता तर एक ग्राहक दिसत नाही़