मस्सा खं : कळंब तालुक्यातील मस्सा खंडेश्वरी येथील चंद्रकांत उत्रेश्वर थोरात (वय ४५) या शेतकऱ्याने अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मस्सा खंडेश्वरी येथील शेतकरी चंद्रकांत थोरात यांच्या शेतातील पिकांचे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून थोरात यांनी शेतातील नदीलगत असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी संजय तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवीचे कलम २०/१४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोकॉ. म्हैत्रे हे करीत आहेत. (वार्ताहर)
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST