शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला भेटून परतणारा शेतकरी पुरात बैलगाडीसह वाहून गेला; १२ तासांनी सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:17 IST

अलापूरच्या शेतकऱ्याचा १२ तासांनंतर सापडला मृतदेह

कन्नड : तालुक्यातील जैतापूर ते हतनूर मार्गावरील वाघनाल्यात बैलगाडीसह सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास काही अंतरावर आढळला. कैलास उत्तमराव कोरडे (वय ५६ वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

अलापूर येथील कैलास कोरडे हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी पळसवाडी येथे सोमवारी सकाळी १० वाजता बैलगाडी घेऊन गेले होते. तेथून परतत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वाघनाला पार करताना पुरामध्ये ते बैलगाडीसह वाहून गेले. यामध्ये एका बैलाचा बुडून मृत्यू झाला, तर दुसरा बैल जोते तुटल्याने पाेहून बाहेर आला. ही बाब लक्षात येताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन शोधमाेहीम सुरू केली. स्थानिकांनी गळ टाकून बैलगाडी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढली. 

मात्र, कैलास कोरडे यांचा शोध लागला नव्हता. याबाबत माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी नायब तहसीलदार दिलीप सोनवणे व देवगाव रंगारी पोलिस यांच्या उपस्थितीत त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; परंतु ते सापडले नव्हते. मंगळवारी सकाळी ६ वाजता घटनास्थळपासून काही अंतरावर पाण्यावर तरंगताना कोरडे यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर बाळू परांडे, उमेश कोरडे आदींनी तो पाण्याबाहेर काढला. त्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. दुपारी १२ वाजता कोरडे यांच्या पार्थिवावर जैतापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

पिशवीत आढळली रक्कम अन् कपडेकैलास कोरडे यांच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या हातात एक पिशवी दिसून आली. त्यात १५ ते २० हजार रुपयांच्या दोन रुपयांच्या नोटा, काही कागदपत्रे व अंगातील बदलेले जुने कपडे आढळल्याची माहिती येथील ग्रामस्थ बाळू परांडे यांनी दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीDeathमृत्यूfloodपूर