शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी बालंबाल बचावला; जीवघेण्या पाठलागाने मात्र अर्धमेला झाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 18:17 IST

जरंडी आणि निंबायती येथील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली

ठळक मुद्देजरंडी शिवारात रंगला जीवघेणा पाठशिवणीचा थरार 

सोयगाव: अंधाराचा फायदा घेवून झाडावर दबा धरून बसलेल्या अस्वलाने थेट शेतकऱ्याच्या अंगावर उडी मारली.  प्रसंगवधान राखून शेतकऱ्याने सतर्कतेमुळे त्याने अस्वलाच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. मात्र, अस्वलाने शेतकऱ्याचा तब्बल तासभर पाठलाग केल्याने तो अर्धमेला झाला. या पाठशिवनीच्या खेळात वेळीच ग्रामस्थ मदतीला धावल्याने शेतकऱ्याची सुटका झाला. ही थरारक घटना रविवारी ( दि. १५ ) रात्री ११ वाजेच्या सुमारास जरंडी शिवारात घडली. 

जरंडी शिवारात सुनील सोन्ने(२७) हा शेतकरी रब्बी हंगामातील मका पिकाचे राखण करण्यासाठी आपल्या शेतावर गेला होता. शेतातील एका झाडा खाली आराम करत असताना सुनीलवर अचानक झाडावरील अस्वलाने उडी मारली. परंतु प्रसंगावधान राखत सुनीलने लगेचच तेथून पळ काढला.मात्र अस्वलाने सुनीलचा पाठलाग सुरु केला. यामुळे सुनीलने मदतीसाठी आरडाओरडा करत तेथून पळ काढला. त्याच्या आणि अस्वलाच्या आवाजाने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अस्वल आणि सुनील यांच्या मधील पाठ शिवणीचा खेळ पाहून ग्रामस्थही थक्क झाले. यानंतर ग्रामस्थांनी अस्वलाला हुसकावून लावले. तब्बल तासभर चालेला पाठशिवणीचा जीवघेणा खेळ थांबला आणि शेतकऱ्याने सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, अस्वलाने शेतकऱ्याचा पिच्छा सोडला होता. मात्र त्याचा मुक्काम जरंडी आणि निंबायती शिवाराजवळ होता. यामुळे घाबरून गेलेल्या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रforestजंगल