शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

... आभाळच फाटले, तर कुठवर करावी शिलाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 05:36 IST

या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’.

विजय सरवदे 

औरंगाबाद : एरव्ही सतत अवर्षणाचा मुकाबला करणारा मराठवाडा यंदा खूप उशिरा झालेल्या अतिवृष्टीने सुन्न झाला आहे. आधीच्या रिमझिम पावसावर डोलणारी पिके परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नष्ट झाली. अक्षरश: अब्जावधी रुपयांची हानी झाली आहे. प्रत्येक गावी जाण्यास, दिलासा देऊन पंचनामे करण्यात प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधीही तोकडे पडत आहेत, असे चित्र आहे.रविवारी कृषी विभागाचे पथक आदिवासी काळदरीच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तेव्हा त्या आदिवासी शेतकºयांना आपणास जागेवरच आर्थिक मदत मिळणार, असे वाटले. पथकातील कर्मचाºयांनी पंचनामा सुरू केला व त्या शेतकºयांकडे कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसाठी आता आमच्याकडे पैसे नाहीत, असे अंकाजी गांगड, लहू गांगड, रामदास मधे, किसान गांगड हे बाधित आदिवासी शेतकरी म्हणाले. ‘आता तुम्हीच आमचे मायबाप. होते नव्हते ते सारे पीक वाया गेले.

या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’. हतबल शेतकºयांचे हे बोलणे ऐकून कर्मचाºयांचे मन हेलावले.शेतकरी ढसाढसा रडलेमदत देण्यासाठी सरकारी यंत्रणा येईलच, या आशेवर चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकºयांचे डोळे रस्त्याकडे लागले आहेत. रविवारी गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे पालकमंत्री शिंदे व आ. सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसFarmerशेतकरी