शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत नामांकित बिल्डरची आत्महत्या, दोन पानांची लिहिली ‘सुसाइड नोट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 06:05 IST

गळफास घेण्यापूर्वी दोन पानांची लिहिली ‘सुसाइड नोट’

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर (५५, रा. मित्रविहार कॉलनी, उल्कानगरी) यांनी घरातील जीममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी  सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अग्रहारकर यांनी आत्महत्येपूर्वी दोन पानांची ‘सुसाइड नोट’ लिहिली असून, त्यात चार  व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक अनिल अग्रहारकर यांचा मित्रविहार कॉलनीमध्ये बंगला आहे. तेथे ते पत्नी, मुलगा, मुलगी आणि सुनेसह राहतात. गुरुवारी  सकाळी बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावरील जीममध्ये गेले.  ७.३० वाजले तरी ते खाली आले नाहीत, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी पत्नी जीममध्ये गेल्या. तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना फासावरून खाली उतरवून जवळच्या हेडगेवार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना घाटीत पाठविण्यात आले. पोलिसांनी घराची झडती घेतल्यानंतर  बेडरुममध्ये एक डायरी आढळून आली. डायरीत अग्रहारकर यांनी आत्महत्या करण्याचे कारण नमूद केले आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर हे बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य संस्था ‘कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (क्रेडाई) औरंगाबाद शाखेचे कोषाध्यक्ष होते. त्यांचा चौरंगी हॉटेलच्या जागेवर बहुमजली इमारतीचा प्रकल्प सुरू होता, तसेच साई टेकडीसह इतर ठिकाणीही त्यांच्या बांधकाम साइट सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस