दुष्काळात संक्रांतीचा बाजार फुलला
By Admin | Updated: January 15, 2016 00:11 IST2016-01-14T23:46:28+5:302016-01-15T00:11:58+5:30
बीड : वर्षभरापासून प्रत्येक सणावर दुष्काळाचे सावट असल्याचे दिसून येत होते; मात्र बुधवारी संक्रांतीच्या सणानिमित्त वाण, सुगडी व लुटायच्या

दुष्काळात संक्रांतीचा बाजार फुलला
बीड : वर्षभरापासून प्रत्येक सणावर दुष्काळाचे सावट असल्याचे दिसून येत होते; मात्र बुधवारी संक्रांतीच्या सणानिमित्त वाण, सुगडी व लुटायच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारात एकच गर्दी केली होती.
संक्रांतीच्या पूर्वसंध्येला, भोगीच्या दिवशी सकाळी बाजारात कमालीची शांतता पाहावयास मिळाली; मात्र दुपारनंतर भाजी मंडई व धोंडीपुरा बाजारपेठेत सामान खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी संक्रांतीला लागणाऱ्या सुपारी, हळद-कुंकू, बिब्याची फुले, गव्हाच्या ओंब्या, टहाळे व लुटायच्या वस्तूृ खरेदी करण्यात महिला व्यस्त होत्या.
गतवर्षीपेक्षा वस्तूंच्या बाजारभावात वाढ झाली तरी महिलांचा खरेदीचा उत्साह काही कमी झाला नाही.
सुपारी २० रुपये छटाक, हळद-कुंकू १० रुपये, बिब्याचे फुल १० रुपये तिळाचे पाकीट २० रुपये, तीळ-गूळ पाकीट २० रूपये, तर लुटायच्या वस्तू ५० रुपयांपासून पुढे विक्रीसाठी बाजारात ठिकठिकाणी दिसून येत होत्या.
बाजार फुलला असला तरी ग्रामीण भागातील महिला अल्प प्रमाणात खरेदीसाठी आल्या होत्या. केवळ औपचारिकता म्हणून परंपरागत आलेल्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या. एकंदरित गेल्या अनेक दिवसांपासून सणावरील दुष्काळाचे सावट संक्रांतीच्या सणानिमित्ताने झटकले असल्याचे दिसून आले. सोने खरेदीकडे मात्र बहुतांश महिलांनी पाठ फिरविल्याचे चित्र पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)