कुटुंब नियोजनासाठी आलेल्या रुग्ण, नातेवाईकांचे हाल
By Admin | Updated: September 14, 2014 23:37 IST2014-09-14T23:22:30+5:302014-09-14T23:37:48+5:30
येलदरी: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी ५४ महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या होत्या. परंतु, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी नसल्यामुळे या रुग्णांना रुग्णालय आवारातच झोपावे लागले.

कुटुंब नियोजनासाठी आलेल्या रुग्ण, नातेवाईकांचे हाल
येलदरी: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी ५४ महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या होत्या. परंतु, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी नसल्यामुळे या रुग्णांना रुग्णालय आवारातच झोपावे लागले. याचे सोयरसुतक कुणालाच नसल्याचे दिसून येते.
येलदरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे़ आरोग्य केंद्रामध्ये जवळपासचे ३० ते ४० गावांतील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात़ परंतु, डॉक्टर मुख्यालयी राहण्याऐवजी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करीत आहेत़ त्यामुळे कर्मचारी मनमानीपणे वागत आहेत़ त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत़ रविवारी या रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी ५४ महिला आल्या होत्या़ परंतु, डॉक्टर नसल्याने रुग्णांना रुग्णालयाच्या परिसरात उघड्यावरच झोपावे लागले़ पाऊस व गारव्यामध्येच रात्र काढण्याची वेळ आली आहे़ याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थ व रुग्णांमधून होत आहे़ (वार्ताहर)