मतदान केले नाही म्हणून कुटुंबावर हल्ला
By Admin | Updated: April 15, 2017 21:26 IST2017-04-15T21:25:34+5:302017-04-15T21:26:53+5:30
अंमळनेर : पाटोदा तालुक्यातील अंतापूर येथे मतदान केले नाही म्हणून एका कुटुंबावर हल्ला चढविल्याची घटना शुक्रवारी घडली.

मतदान केले नाही म्हणून कुटुंबावर हल्ला
अंमळनेर : पाटोदा तालुक्यातील अंतापूर येथे मतदान केले नाही म्हणून एका कुटुंबावर हल्ला चढविल्याची घटना शुक्रवारी घडली.
काशीनाथ तात्याबा गाडे हे शुक्रवारी दुपारी तीन वाजता घरी होते. यावेळी गावातीलच विजू गाडे समर्थकांसमवेत त्यांच्या घरी आला. त्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मतदान का केले नाही, अशी कुरापत काढली. त्यानंतर वाद चिघळला. यावेळी काशीनाथ गाडेंसह भाऊ व पुतण्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विजू गाडे, राजू गाडे, सोनबा गाडे, धनंजय गाडे, हनुमंत गाडे, आश्रू गाडे यांच्यावर अंमळनेर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. (वार्ताहर)