नेलवाडमध्ये महिलांच्या हस्ते झाले ७ ठिकाणी ध्वजारोहण
By Admin | Updated: January 28, 2015 00:57 IST2015-01-28T00:51:21+5:302015-01-28T00:57:02+5:30
गोविंद इंगळे , निलंगा निलंगा तालुक्यातील नेलवाड गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, गावात ७ ठिकाणी ध्वजारोहण झाले़ या सातही ठिकाणी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करुन

नेलवाडमध्ये महिलांच्या हस्ते झाले ७ ठिकाणी ध्वजारोहण
गोविंद इंगळे , निलंगा
निलंगा तालुक्यातील नेलवाड गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, गावात ७ ठिकाणी ध्वजारोहण झाले़ या सातही ठिकाणी महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करुन एक आगळा-वेगळा पॅटर्न समाजासमोर नेलवाड गावाने उभा केला आहे़
गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे ध्वजारोहण सरपंच विद्याताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले़ पोलिस पाटील कार्यालयातील ध्वजारोहण पोलिस पाटील शिवाजीराव यांच्या सौभाग्यवती सरोजनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ तर ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच विद्याताई यांच्या हस्ते झाले़ सार्वजनीक ध्वजारोहण जि़प़सदस्या सुष्मा फुलसूरे यांच्या हस्ते करण्यात आले़ नेलवाडच्या समाजमंदीरातील ध्वजारोहण पंचशीला दिगंबर सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले़ तर जि़प़ शाळेत मुख्याध्यापक एम़एम़जाधव यांच्या ऐवजी त्यांच्या सहकारी शिक्षिका एम़व्हीग़ाजी यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आली़
महाराष्ट्र विद्यालय या खाजगी शाळेतील ध्वजारोहणही मुख्याध्यापकाऐवजी सरपंच विद्याताई जाधव यांच्या हस्ते झाले़ सार्वजनीक वाचनालयात वाचनालयाच्या सचिव मिराबाई धुमाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले़
अंगणवाडी क्रमांक ३ मधील इमारतीचे उद्घाटनही प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले़ जि़प़सदस्या सुष्मा फुलसूरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा झाला़ शालेय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव प्रमाणपत्र देऊन सुष्माताईच्या हस्ते करण्यात आला़ महिलांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम नेलवाड गावात राबविल्याने सर्वत्र कौतुक होत असून, जिच्या हाती ध्वजाची दोरी, ती राष्ट्राला उद्धारी , असे कौतुक उद्गार यावेळी काढण्यात आले़
शासनाने महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण दिले असले तरी नेलवाडच्या ग्रामस्थांनी ध्वजारोहणाला १०० टक्के संधी दिली़ हा एक आदर्श असल्याचे राजेंद्र धुमाळ, वाचनालयाचे अध्यक्ष किसनराव धुमाळ म्हणाले़यावेळी बजरंग जाधव, अरुणा धुमाळ, बेबीताई मुळे, दिनकर जाधव, ज्ञानेश्वर भोसले, हुलसूरे गुरुजी, व्ही़जे़पोतदार, शिवाजीराव पाटील आदींची उपस्थिती होती़