रिकाम्या पोत्यात ‘तो’ भरायचा बनावट खत

By Admin | Updated: July 12, 2016 00:56 IST2016-07-12T00:43:17+5:302016-07-12T00:56:20+5:30

लातूर : डीएपी खताचे नवे रिकामे पोते आणून त्यात बनावट खत भरायचा. पॅकिंगतंत्र अवलंबून तो शेतकऱ्यांना १००० रुपयांना विकायचा.

False fertilizer to fill 'empty' in empty vessel | रिकाम्या पोत्यात ‘तो’ भरायचा बनावट खत

रिकाम्या पोत्यात ‘तो’ भरायचा बनावट खत


लातूर : डीएपी खताचे नवे रिकामे पोते आणून त्यात बनावट खत भरायचा. पॅकिंगतंत्र अवलंबून तो शेतकऱ्यांना १००० रुपयांना विकायचा. १२५० रुपयांचा भाव असताना १००० रुपयांना विकतो कसा, असा संशय आल्याने दिनेश कुलकर्णी या विक्रेत्याचे पितळ उघडे पडले.
निलंगा तालुक्यातील येळनूर येथील दिनेश कुलकर्णीचा खत विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याने निलंगा एमआयडीसी परिसरात गोडावून टाकले. या गोडावूनमध्ये डीएपी खताचे रिकामे पोते आणून त्यात डीएपीच्या धर्तीवरचा खत तयार करायचा. हा खत तयार करण्यासाठी साधारणपणे एका पोत्यासाठी ३०० रुपये तो खर्च करायचा. पॅकिंगसाठी आणि रिकाम्या पोत्यांसाठी वेगळा खर्च. ४०० ते ५०० रुपये खर्च करून तयार झालेला हा बनावट डीएपी खत तो १००० रुपयांना एक पोत्याप्रमाणे विकायचा. मात्र आता त्याचे पितळ उघडे पडले असून, तो पोलिस कोठडीची हवा खात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: False fertilizer to fill 'empty' in empty vessel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.