धरणात पडून मेंढपाळाचा मृत्यू
By Admin | Updated: July 8, 2017 23:49 IST2017-07-08T23:46:55+5:302017-07-08T23:49:52+5:30
येलदरी: दळण आणण्यासाठी होडीतून जाणाऱ्या मेंढपाळाचा येलदरी धरणात पडून मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

धरणात पडून मेंढपाळाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी: दळण आणण्यासाठी होडीतून जाणाऱ्या मेंढपाळाचा येलदरी धरणात पडून मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परिसरात जालना जिल्ह्यातील मेंढपाळ वास्तव्यास आहेत. शिवाजी सुखदेव मैद (वय ३५, रा. वलसा ता. भोकरदन) हे ७ जुलै रोजी दुपारी बामणी शिवारातील तलाव पात्रातून येलदरी येथे होडीच्या सहाय्याने दळण आणण्यासाठी येत होते. अचानक अचानक होडीतून त्यांचा तोल गेला व ते पाण्यामध्ये पडले. घटनेनंतर त्यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी शोध घेतला. परंतु, ते आढळले नाहीत. ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात शिवाजी मैद यांचा मृतदेह अडकल्याचे आढळून आले.
त्यानंतर जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जिंंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.