बनावट सोने तारण; आरोपींच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: June 14, 2017 00:31 IST2017-06-14T00:30:18+5:302017-06-14T00:31:34+5:30
जालना : जालना पीपल्स बँकेच्या बदनापूर शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणात अटक असलेल्या मुख्य आरोपींना पोलिसांनी मंगळवारी बदनापूर न्यायालयात हजर केले

बनावट सोने तारण; आरोपींच्या कोठडीत वाढ
जालना : जालना पीपल्स बँकेच्या बदनापूर शाखेतील बनावट सोने तारण प्रकरणात अटक असलेल्या मुख्य आरोपींना पोलिसांनी मंगळवारी बदनापूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी तीन दिवसांनी वाढवली आहे. जेपीसी बँक बनावट सोने तारण प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार मंत्री व त्याची मुले प्रितेश मंत्री व गौरव मंत्री यांना पोलिसांनी ७ जून रोजी पुण्यातून अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने तिघांनाही मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे पोलिसांनी तिघांंना दुपारनंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी सांगितले.