बनावट चालक मागतोय जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:33 IST2017-10-07T00:33:49+5:302017-10-07T00:33:49+5:30
मॉर्निंग वॉक करणाºया चार जणांना चिरडणा-या जीप चालकाऐवजी दुस-याच व्यक्तीने न्यायालयात या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

बनावट चालक मागतोय जामीन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मॉर्निंग वॉक करणाºया चार जणांना चिरडणा-या जीप चालकाऐवजी दुस-याच व्यक्तीने न्यायालयात या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मात्र खरा वाहनचालक शोधून काढला असून, अपघातात किरकोळ मार लागलेल्या व्यक्तीच्या हातातून तो निसटून पळून गेला होता. शिवाय त्याचा मोबाइलही घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केला.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मॉर्निंग वॉक करणाºया चौघांना भरधाव स्कॉर्पिओ जीपने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. इतर दोन जण जखमी झाले. १६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास केम्ब्रिज शाळेसमोरील चौकात हा अपघात झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून, पोलीस पसार झालेल्या जीपचालक-मालकाचा शोध घेत आहेत. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या एकाने तीन दिवसांपूर्वी न्यायालयासमोर जबाब नोंदविला असून, त्यांच्या जबाबानुसार त्यांनी जीपमधून बाहेर पडणाºया जीपचालकास पकडले आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. यावेळी आरोपी जीपचालकाने त्याचे नाव त्यांना सांगितले आणि तो जर येथे थांबला तर लोक त्यास मारून टाकतील, अशी भीती व्यक्त करून तो त्यांच्या हाताला झटका देऊन पसार झाला. दरम्यान, मंगरूळ पीर (जि. वाशिम) येथील एका व्यक्तीने या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे सादर करण्याचे न्यायालयाने एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविले. पोलिसांना हा प्रकार समजताच धक्काच बसला. ज्याचा या घटनेशी संबंध नाही, अशी व्यक्ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करीत असल्याने खºया आरोपी चालकास वाचविण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय आला. स्वत:ला आरोपी म्हणणाºया व्यक्तीच्या जामीन अर्जावर शनिवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.