बनावट दस्तऐवज; मुख्याध्यापकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:07 IST2017-04-08T00:06:47+5:302017-04-08T00:07:09+5:30
बीड : बनावट दस्तऐवज तयार करून मुख्याध्यापक पदाची वैयक्तिक मान्यता मिळविल्याचे समोर आले

बनावट दस्तऐवज; मुख्याध्यापकावर गुन्हा
बीड : बनावट दस्तऐवज तयार करून मुख्याध्यापक पदाची वैयक्तिक मान्यता मिळविल्याचे समोर आले. त्यानंतर जि.प. शिक्षण विभागाने संबंधित मुख्याध्यापकावर गुरुवारी शहर ठाण्यात फिर्याद दिली.
रत्नाकर सूर्यभान दुशिंग असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते गेवराई येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. मुख्याध्यापक नेमण्याचे अधिकार संस्थांना आहेत. त्यानुसार दुशिंग यांनी मुख्याध्यापक पदासाठी बनावट दस्तऐवज जि.प. माध्यमिक विभागात सादर केली. त्यानुसार त्यांना मुख्याध्यापकपदी नेमण्यात आले. मात्र, तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने खातरजमा केली, तेव्हा दुशिंग यांनी फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार सीईओ नामदेव ननावरे यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. उपशिक्षणाधिकारी (मा.) उस्मानी नजमा सुलताना यांनी दुशिंग यांच्या विरुद्ध शहर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक व बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी त्यांच्या गुन्हा नोंद झाला. तपास फौजदार कैलास बेले हे करीत आहेत. (वार्ताहर)