नकली नोटा म्हणून चोरट्याने १२ हजार लांबविले
By Admin | Updated: July 13, 2014 00:24 IST2014-07-13T00:09:26+5:302014-07-13T00:24:09+5:30
नायगाव बाजार : बँकेत रक्कम उचललेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला नकली नोटा आहेत म्हणून चोरट्याने १२ हजार रुपये घेवून पोबारा केला़

नकली नोटा म्हणून चोरट्याने १२ हजार लांबविले
नायगाव बाजार : बँकेत रक्कम उचललेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला नकली नोटा आहेत म्हणून चोरट्याने १२ हजार रुपये घेवून पोबारा केला़
येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादमध्ये शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक बी़जी़ नरवाडे यांनी ४० हजार रुपये रक्कम उचलली़ बाजूला बसून उचललेली रक्कम मोजत असताना त्या ठिकाणी एक अनोळखी इसम आला व त्याने या रकमेमध्ये काही नकली नोटा आहेत म्हणून नरवाडे यांच्या हातामधून काही रक्कम काढून घेतली व पोबारा केला़ संपूर्ण रक्कम मोजल्यानंतर नरवाडे यांनी त्या इसमाचा शोध घेण्यास सुुरुवात केली़ परंतु तो मिळून आला नसल्याने त्यांनी आरडाओरड केली़ शाखेतील इतर ग्राहकांनी देखील त्या इसमाचा शोध घेतला़ परंतु तो मिळून आला नाही़ घटनेची माहिती पोलिसांना कळताच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्वरित नाकेबंदी करून तपासणी केली, परंतु काहीच उपयोग झाला नाही़ (वार्ताहर)