पिंजरे लावूनही नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अपयश

By | Published: December 3, 2020 04:10 AM2020-12-03T04:10:29+5:302020-12-03T04:10:29+5:30

गोदाकाठच्या गावात नरभक्षक बिबट्याच्या रूपाने साक्षात काळ फिरत असल्याने शेतीचे उद्योग थांबले आहेत. आपेगाव येथील अशोक औटे व ...

Failure to catch man-eating leopard even with cages | पिंजरे लावूनही नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अपयश

पिंजरे लावूनही नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अपयश

googlenewsNext

गोदाकाठच्या गावात नरभक्षक बिबट्याच्या रूपाने साक्षात काळ फिरत असल्याने शेतीचे उद्योग थांबले आहेत. आपेगाव येथील अशोक औटे व त्यांचा मुलगा कृष्णा या पिता-पुत्राचा त्यांच्याच शेतात १६ नोहेंबर रोजी बिबट्याने फडशा पाडल्यानंतर परिसरातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. यामुळे गोदाकाठचा शेतशिवार दुपारीच निर्मनुष्य होत आहे. ऊसतोड मजुरांनी उसाचे फड सोडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरातील ऊस मशीनने तोडावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आपेगाव जि. प. सदस्या शिल्पा ज्ञानेश्वर कापसे यांनी केली आहे.

चौकट

लोहगाव परिसरात बिबट्या

लोहगाव परिसरात मंगळवारी दुपारी शेतात बिबट्या दिसल्याचा वनरक्षक राजू जाधव यांना फोन आला. त्यानंतर सायंकाळी वनपथकाने लोहगाव परिसरात धाव घेऊन तेथे शोध सुरु केला होता. तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रमस्थांना बिबट्याने दर्शन दिल्याने सध्यातरी तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने घर केले आहे. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनखात्याने यंत्रणा वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Failure to catch man-eating leopard even with cages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.