‘पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत लढा देणार’

By Admin | Updated: July 15, 2017 23:53 IST2017-07-15T23:48:25+5:302017-07-15T23:53:02+5:30

कळमनुरी : शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सेनेच्या बैठकीत घेण्यात आला. येथील विश्रामगृहावर १५ जुलै रोजी सेनेची बैठक घेण्यात आली.

'Fail to fight full debt forgiveness' | ‘पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत लढा देणार’

‘पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत लढा देणार’

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सेनेच्या वतीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सेनेच्या बैठकीत घेण्यात आला.
येथील विश्रामगृहावर १५ जुलै रोजी सेनेची बैठक घेण्यात आली. यावेळी आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, डॉ. वसंतराव देशमुख, दिलीप घुगे, अंकुश आहेर, अ‍ॅड. रवि शिंदे आदींनी बैठकीत मार्गदर्शन केले. पक्ष संघटना बांधणी करून आगामी लोकसभा निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, अस निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, चंद्रकांत देशमुख, सखाराम उबाळे, संतोष सारडा, फकीरा मुंडे, नंदकिशोर खिल्लारे, अतुल बुर्से, बाळू पारवे, आप्पाराव शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: 'Fail to fight full debt forgiveness'