कारखाने सुरू न होण्याच्या स्थितीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:09 IST2017-08-11T00:09:11+5:302017-08-11T00:09:11+5:30

काणत्या न् कोणत्या कारणाने साखर कारखाने मात्र चालू होण्याच्या स्थितीत नाहीत. यंदाचा गळीत हंगाम आॅक्टोबरपासून सुरू होईल.

 Factory is not in the starting position! | कारखाने सुरू न होण्याच्या स्थितीत!

कारखाने सुरू न होण्याच्या स्थितीत!

स. सो. खंडाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गतवर्षी मराठवाड्यात पाऊसकाळ चांगला राहिला. त्यामुळे ऊस भरपूर आहे. मात्र, काणत्या न् कोणत्या कारणाने साखर कारखाने मात्र चालू होण्याच्या स्थितीत नाहीत. यंदाचा गळीत हंगाम आॅक्टोबरपासून सुरू होईल.
औरंगाबाद, जालना, बीड, धुळे, जळगाव, नंदूरबार या सहा जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांशी निगडित प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय औरंगाबादेत क्रांतीचौकात आहे. एन. व्ही. गायकवाड या प्रादेशिक सहसंचालक आहेत. या सहा जिल्ह्यांत गतवर्षी सतरा साखर कारखाने चालू होते. यावर्षी एवढे साखर कारखाने सुरू होतील की नाही, याबद्दल थोडी साशंकताच आहे. साखर कारखान्यांची आर्थिक अडचण यामागील कारण असून, आणखी आर्थिक अडचणी वाढवून घेण्यापेक्षा कारखानाच बंद असलेला बरा, असे साखर कारखानदारांना वाटत असते. उसाचे गाळप करू शकू की नाही, कामगार- कर्मचाºयांचे वेतन देऊ शकू की नाही, असा घोर या कारखानदारांना लागलेला असतो.
जयभवानी, वैद्यनाथ, सिद्धेश्वर, पैठण, गंगापूर येथील साखर कारखाने गतवर्षीही बंदच होते. यावर्षीही ते सुरू होण्याची शक्यता कमीच दिसते. बीड जिल्ह्यात उसाचे क्षेत्र भरपूर असूनही त्या जिल्ह्यातले कारखाने बंदच राहण्याची शक्यता आहे.
लोकमतशी बोलताना साखर सहसंचालक एन. व्ही. गायकवाड यांनी सांगितले की, माझ्या हद्दीतील सहा जिल्ह्यांमध्ये १ लाख ७ हजार ८८४ हेक्टर इतके एकूण लागवड क्षेत्र आहे. यंदा ६४ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल आणि ते मागच्या वर्षीपेक्षा जास्त राहील. गतवर्षी २२ लाख मेट्रिक टन एवढेच साखरेचे उत्पादन झाले. गतवर्षी ऊस कमी असूनही १७ साखर कारखाने चालू होते. यावर्षी ऊस भरपूर आहे. मात्र, कारखाने किती चालू होतील, हा औत्सुक्याचाच भाग आहे. या सहा जिल्ह्यांत आडसाली लागवड क्षेत्र ३९६६.४९ हेक्टर, पूर्व हंगामी क्षेत्र-३२०८८.१०, सुरू-४५५९४.९४, खोडवा- २६२३५.१२. गतवर्षी या सहा जिल्ह्यांतील कारखान्यांच्या साखरेचा उतारा दहा टक्क्यांच्या आतच राहिला. नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरूझाला होता. जळगाव जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा गळीत हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाला होता.
यावर्षी पावसाच्या लहरी कारभारामुळे ऊस क्षेत्रावर व उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Web Title:  Factory is not in the starting position!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.