शहरातील ७९ शाखांत जन-धन योजनेचे खाते उघडण्याची सोय
By Admin | Updated: September 5, 2014 00:09 IST2014-09-05T00:00:21+5:302014-09-05T00:09:23+5:30
रामेश्वर काकडे, नांदेड नांदेड : केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान जन-धन योजना राबविण्यात येत असून योजनेच्या सहाय्याने बँकेत सहज खाते उघडण्याची व्यवस्था केली आहे.

शहरातील ७९ शाखांत जन-धन योजनेचे खाते उघडण्याची सोय
रामेश्वर काकडे, नांदेड
नांदेड : केंद्र शासनाच्या वतीने पंतप्रधान जन-धन योजना राबविण्यात येत असून योजनेच्या सहाय्याने बँकेत सहज खाते उघडण्याची व्यवस्था केली आहे. या योजनेतंर्गत शहरातील वेगवेगळ््या बँकांच्या ७९ शाखांमधून शहरवासियांना खाते काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक खातेदाराचा एक लाखाचा अपघात विमा काढण्यात येणार असून झिरो बॅलेंसवर खाते उघडण्यात येत आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी शहरातील वेगवेगळ््या बँकेला वॉर्डनिहाय सुविधा उपलब्ध केली आहे. बँकांना दत्तक दिलेले वॉर्ड असे- युबीआय शाखा अशोकनगर वार्ड क्र.१, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चैतन्यनगर वार्ड क्र.२, कॉर्पोेरेशन बँक व्हीआयपी रोड वार्ड क्र.३, बँक आॅफ इंडिया, व्हीआयपी रस्ता वार्ड ४, देना बँक आनंदनगर वार्ड क्र.५ व ६, एसबीएच शाखा श्रीनगर वार्ड क्र. ७ व ८, युको बँक शाखा छत्रपती चौक वार्ड ९, बीओएम शाखा असदुल्लाबाद वार्ड क्र.१० व ११, महाराष्ट्र ग्रामीण बँक (एमजीबी) श्यामनगर वार्ड.क्र.१२, एसबीआय शाखा एपीएमसी वार्ड क्र. १३ व १४, ओबीसी शाखा चिखलवाडी वार्ड क्र. १५ व १६, बीओबी शाखा महावीर चौक वार्ड क्र. १७,१८ व १९, विजया बँक शाखा शिवाजीनगर वार्ड क्र. २०, २१, करुर वैश्य बँक -व्हीआयपी रस्ता वार्ड क्र.२२, बँक आॅफ महाराष्ट्र पीपल्स कॉलेज वार्ड क्र.२३, २४, एसबीआय शाखा यशवंतनगर वार्ड क्र.२५, २६, एसबीएच शाखा शिवाजीनगर वार्र्ड क्र.२७, आंध्रा बँक शाखा व्हीआयपी रोड वार्र्ड क्र.२८, एसबीआय डॉक्टरलेन वार्ड क्र.२९, ३०, महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर वार्र्ड क्र.३१, एसबीएच शिवाजीनगर वार्ड क्र.३२, आयडीबीआय शाखा गुरुद्वारा वार्र्ड.क्र.३३, ३४, आयओबी गुरुव्दारा वार्र्ड.क्र.३५, पी अॅन्ड एस गुरुद्वारा वार्र्ड क्र.३६,३७, अलाहाबाद शाखा महावीर चौक वार्र्ड क्र.३८,३९, एसबीएच देगलूर नाका वार्र्ड क्र.४०,४१, एसबीएच शाखा गुरुद्वारा वार्र्ड ४२,४३, युबीआय तारासिंग मार्केट वार्र्ड ४४ व ४५, बँक आॅफ इंडिया तारासिंग मार्केट वार्र्ड ४६, ४७, आयसीआयसीआय शाखा कलामंदिर वॉर्र्ड ४८, सिंडीकेट कलामंदीर वार्र्ड ४९, पीएनबी शाखा जुनामोंढा वार्र्ड ५०,५१ व ५२, बँक आॅफ महाराष्ट्र शाखा होळी वार्र्ड क्र.५३ व ५४, एसबीपी शाखा गुरुद्वारा वार्र्ड ५५, एसबीएच शाखा एडीबी वार्र्ड ५६,५७,५८, कॅनरा बँक तारासिंग मार्केट वार्र्ड ५९, बँक आॅफ महाराष्ट्र तारासिंग मार्केट वार्र्ड ६०, एसबीएच वजिराबाद वार्र्ड ६१,६२, एचडीएफसी कलामंदिर वार्र्ड ६३, सेंट्रल बँक आॅफ इंडिया वजिराबाद वार्र्ड ६४, देना बँक जी. जी. रस्ता वार्र्ड ६५,६६,६७, एसबीएच शाखा सिडको वॉर्र्ड क्र.६८, बीओबी शाखा हडको वार्र्ड क्र.६९, एसबीएच शाखा सिडको वार्र्ड क्र.७०,७१, बीओबी हडको वार्र्ड क्र.७२, देना बँक जी.जी.रस्ता वार्र्ड क्र.७३, एसबीएच तरोडानाका वार्र्ड क्र.७४, एमजीबी भावसार चौक वार्र्ड क्र.७५, एसबीएच तरोडानाका वार्र्ड क्र.७६, बीओबी तरोडानाका वार्र्ड क्र.७७, एसबीआय तरोडानाका वार्र्ड क्र.७८, एक्सिस बँक शाखा तरोडानाका वार्र्ड क्रमांक ७९़ (प्रतिनिधी)