सणासुदीच्या तोंडावर एटीएममध्ये खडखडाट !
By Admin | Updated: March 26, 2017 23:26 IST2017-03-26T23:25:24+5:302017-03-26T23:26:05+5:30
लातूर : शहरातील बहुतांश एटीएममध्ये ऐन सणासुदीच्या तोंडावर खडखडाट असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

सणासुदीच्या तोंडावर एटीएममध्ये खडखडाट !
लातूर : शहरातील बहुतांश एटीएममध्ये ऐन सणासुदीच्या तोंडावर खडखडाट असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे असले तरी त्या एटीएमवर पैसे काढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काही तासांतच पैसे असलेल्या एटीएममध्येही खडखडाट जाणवू लागला आहे. परिणामी, ऐन सणासुदीत नागरिकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
लातूर शहरात विविध मार्गांवर आणि चौकांत राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम सेंटर उभारण्यात आले आहेत. या सेंटरवरून पैसे काढण्यासाठी नागरिक गर्दी करीत असले तरी बहुतांश एटीएममध्ये पैसेच नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या एटीएमवरून त्या एटीएमवर नागरिकांना पैशासाठी फिरावे लागत आहे. मार्च एण्ड असल्याने सुटीच्या दिवशी बँका सुरू असल्या तरी एटीएममध्ये मात्र खडखडाट असल्याने ग्राहकांची गैरसोय आहे.