शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे; मराठवाड्यातील पाच आमदारांची वाढली धाकधूक

By स. सो. खंडाळकर | Updated: May 11, 2023 11:49 IST

सत्तासंघर्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. ती आता संपत आहे. हा निकाल नेमका काय लागतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

छत्रपती संभाजीनगर : सत्तासंघर्षाच्या निकालात मराठवाड्यातील पाच आमदारांवर टांगती तलवार असल्याने ते अस्वस्थ आहेत. तसेच पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या सुरत, गुवाहाटी व गोवा दौऱ्यात सहभागी होते. त्यांनाही आपल्या भवितव्याची चिंता भेडसावते आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. त्याला जबरदस्त तडा या घटनेने बसला होता. एकनाथ शिंदे यांच्या या उठावात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार व संजय शिरसाट अग्रभागी होते. शिरसाट यांनी तर गुुवाहाटीवरूनच उध्दव ठाकरे यांना आव्हान देणारे पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. भुमरे व सत्तार यांच्याही प्रतिक्रिया तिखटच होत्या. विशेषत: उध्दव ठाकरे यांच्याबद्दलच अधिक तक्रारी होत्या. शिवाय संजय राऊत हे आम्हाला उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हते, असा आरोपही त्यांनी केला होता.

धाराशिवचे तानाजी सावंत यांचाही अपात्र होऊ शकणाऱ्या आमदारांच्या यादीत समावेश आहे. संभाव्य उठावासाठी दीडशे बैठका झाल्या होत्या व या बैठकांना देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून येत असत, असा गौप्यस्फोट करून त्यांनी अलीकडेच खळबळ उडवून दिली होती. छत्रपती संभाजीनगर (मध्य)चे आ. प्रदीप जैस्वाल व वैजापूरचे आ. प्रा. रमेश बोरनारे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नसली तरी ते गुवाहाटीला गेले होते. तसेच मराठवाड्यातून हिंगोलीचे वादग्रस्त आ. संतोष बांगर, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले व नांदेडचे बालाजी कल्याणकर हेही गुवाहाटीला गेले होते. यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार नाही.

सारेच आमदार जोमात सत्तासंघर्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. ती आता संपत आहे. हा निकाल नेमका काय लागतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्यांपैकी आ. संजय शिरसाट यांची मंत्री होण्याची अतीव इच्छा मात्र अद्याप पूर्ण झालेली नाही. ते सध्या शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पण, हल्ली त्यांची गाडी सुसाट आहे. संदीपान भुमरे यांच्या टीकेलाही धार आली आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद