दुसऱ्या दिवशीही सर्वदूर पाऊस
By Admin | Updated: June 15, 2017 23:20 IST2017-06-15T23:14:53+5:302017-06-15T23:20:01+5:30
हिंगोली : जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवसांपासून अधून- मधून पाऊस हजेरी लावत आहे.

दुसऱ्या दिवशीही सर्वदूर पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवसांपासून अधून- मधून पाऊस हजेरी लावत आहे. तर गुरुवारीही सर्व दुर पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
यंदाही मृग नक्षत्रेताच पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीपाच्या पेरणीस शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अधून मधून पाऊस हजेरी लावत आहे. बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी तर हलक्याशा पावसावर खरीपाच्या पेरणीस सुरुवात केली होती. पेरणी गतीने होण्यासाठी शेतकरी बैलजोडीला बगल देत ट्रॅक्टरने पेरणी करुन घेत आहेत. गुरुवारी वारंगा फाटा, वसमत, सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ परिसरात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तर हिंगोली येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत होते.