शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: August 28, 2014 01:40 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी सर्वदूर पाऊस झाला असून,

लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी सर्वदूर पाऊस झाला असून, बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २०.९२ मि.मी. इतका पाऊस झाला. पोळ्याच्या पूर्वसंध्येपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.गेल्या महिनाभरापासून पावसाने ताण दिला होता. त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. परंतु, पोळ्याच्या पूर्वसंध्येला सुरु झालेला रिमझिम पाऊस बुधवारपर्यंत कायम राहिला आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला. रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. या पावसाळ्यात कोरडेठाक असलेल्या नदीपात्रात काहीअंशी पाणी आले आहे. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील लातूर, औसा, उदगीर, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, रेणापूर, चाकूर या तालुक्यांत पाऊस झाला आहे.मंगळवारी लातूर तालुक्यात १.५० मि.मी., औसा तालुक्यात १.४३, रेणापूर तालुक्यात १२.७५, उदगीर ३४, अहमदपूर ७.००, चाकूर ८.२०, जळकोट ३५, निलंगा १३.८८, देवणी २२.३३, शिरूर अनंतपाळ ८.५३ असा एकूण सरासरी १४.४४ मि.मी. पाऊस झाला आहे. तर बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लातूर ३९.६२ मि.मी., औसा २४.८५, रेणापूर १६.००, उदगीर २६.७१, अहमदपूर ११.८३, चाकूर ३३, जळकोट २३, निलंगा ११.३८, देवणी १९.६६, शिरूर अनंतपाळ ३.६६ असा एकूण सरासरी २०.९२ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतातील पिके वाळू लागली होती तर काही ठिकाणी कोमेजली होती. आता या पावसामुळे पिकांना उभारी येणार आहे. माना टाकत असलेली पिके कालपासून डोलू लागली आहेत.जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा, रावणकोळा, अतनूर परिसरातही मंगळवारी रात्री मोठा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, नद्या, नाले व ओढ्यांना थोडे पाणी आल्याने बळीराजा सुखावला आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी जिल्ह्यात सरासरी ६०४.६२ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा २७८.०२ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३२६.६ मि.मी.ने पाऊस कमी आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे छोट्या नद्या-नाल्यांचे पात्र ओलावले आहे. परंतु, त्यात अद्याप वाहते पाणी नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.४दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, बुधवारी रिमझिम पावसाची बरसात सुरू होती. शिवाय, सूर्यदर्शन न झाल्यामुळे आणखी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. लातूर शहरात मंगळवारी रात्री ९ वाजेपासून ११ वाजेपर्यंत पाऊस होता. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते.