ज्वारी पिकाची काढणी लांबली
By Admin | Updated: March 15, 2017 00:01 IST2017-03-14T23:57:59+5:302017-03-15T00:01:43+5:30
परतूर: तालूक्यात यावर्षी शाळू ज्वारीची काढणी लांबली

ज्वारी पिकाची काढणी लांबली
परतूर: तालूक्यात यावर्षी शाळू ज्वारीची काढणी लांबली असून अनेक शिवारातील शेतात ज्वारी अद्यापही उभीच दिसत आहे.
यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने व पावसाळ्यत शेवटपर्यंत पाऊस पडल्याने शेतात वापसाच झाली नाही. तणाने भरलेली शेत लवकर पेरणी योग्य करता आली नाही. शेतात पाणी असल्याने पेरणी पूर्व मशागत वेळेत झाली नाही. यामुळे शाळू ज्वारीची पेरणीही लांबली. तसेच यावर्षी थंडीही चांगलीच असल्याने ज्वारीचे पीक फारसे जोमदार आले नाही. ज्वारीच्या पिकाला थंडीचे वातावरण पोषक नसल्याने ज्वारीच्या पिकाची पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. व कणसात दाणेही फारसे भरले नाही. यामुळे ज्वारीच्या उत्पादनातही घट होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत. दरवर्षी फेब्रुवारी अखेर ज्वारीची काढणी होउन शेतकरी कडबीच्या गंजीही लावायचे मात्र यावर्षी शेतात ज्वारीचे पीक उभेच आहे. एकूणच बदलत्या वातावरणाचा ज्वारीच्या पिकावर विपरीत परिणाम होऊन काढणी तब्बल एक महिना लांबली आहे.