शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त बिलाचा ‘खेळ’ अंगलट!

By admin | Updated: December 4, 2014 00:55 IST

बीड : अंगणवाडी केंद्रांसाठी पुरविलेल्या शैक्षणिक साहित्य व खेळणीच्या पुरवठादाराला नियमबाह्यपणे जादा बिल अदा करणे एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे

बीड : अंगणवाडी केंद्रांसाठी पुरविलेल्या शैक्षणिक साहित्य व खेळणीच्या पुरवठादाराला नियमबाह्यपणे जादा बिल अदा करणे एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्याकडून अतिरिक्त देयकाची रक्कम वसूल करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.२०१०- ११ या कालावधीत बीड जि.प. मध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीमती के. एस. तांदळे या कार्यरत होत्या. पूर्व प्राथमिक शैक्षणिक साहित्य अंतर्गत अंगणवाड्यांतील बालकांसाठी शैक्षणिक बौद्धिक, खेळणी संचपुरवठा करण्यात आला होता. मात्र, या साहित्य पुरवठादारास तब्बल ७ लाख ९३ हजार ६० रुपये इतकी रक्कम नियमबाह्यपणे जादा देण्यात आली होती. मूळ देयकापेक्षा जास्त निधी अदा केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तो या विभागाच्या लेखापरीक्षणात ! त्यानंतर मुंबई स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियम १९३० नियम ११ अन्वये जादा देयकाची रक्कम श्रीमती तांदळे यांच्याकडून वसूल करण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अतिरक्ति देयकास तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तांदळे याच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. खुलासा न दिल्यास रक्कम वसुलीची कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी आयुक्त संजीव जैस्वाल यांनी दिली आहे. (प्रतिनिधी) ४श्रीमती के. एस. तांदळे या सेवानिवृत्त आहेत.४आयुक्तांची नोटीस आल्यानंतर त्यांना सीईओंमार्फत बजावण्यात आले मात्र १५ दिवसात खुलासा करणे आवश्यक असताना महिना उलटूनही त्यांनी खुलासा केलेला नाही.४याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. ए. इनामदार म्हणाले, प्रकरण जुने आहे. आयुक्तांकडून आलेली नोटीस संबंधितांना दिलेली आहे.४खुलासा प्राप्त होताच वरिष्ठांना सादर करण्यात येईल.