अतिरिक्त बिलाचा ‘खेळ’ अंगलट!
By Admin | Updated: December 4, 2014 00:55 IST2014-12-04T00:21:17+5:302014-12-04T00:55:06+5:30
बीड : अंगणवाडी केंद्रांसाठी पुरविलेल्या शैक्षणिक साहित्य व खेळणीच्या पुरवठादाराला नियमबाह्यपणे जादा बिल अदा करणे एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे

अतिरिक्त बिलाचा ‘खेळ’ अंगलट!
बीड : अंगणवाडी केंद्रांसाठी पुरविलेल्या शैक्षणिक साहित्य व खेळणीच्या पुरवठादाराला नियमबाह्यपणे जादा बिल अदा करणे एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्याकडून अतिरिक्त देयकाची रक्कम वसूल करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.
२०१०- ११ या कालावधीत बीड जि.प. मध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीमती के. एस. तांदळे या कार्यरत होत्या. पूर्व प्राथमिक शैक्षणिक साहित्य अंतर्गत अंगणवाड्यांतील बालकांसाठी शैक्षणिक बौद्धिक, खेळणी संचपुरवठा करण्यात आला होता. मात्र, या साहित्य पुरवठादारास तब्बल ७ लाख ९३ हजार ६० रुपये इतकी रक्कम नियमबाह्यपणे जादा देण्यात आली होती. मूळ देयकापेक्षा जास्त निधी अदा केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तो या विभागाच्या लेखापरीक्षणात !
त्यानंतर मुंबई स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियम १९३० नियम ११ अन्वये जादा देयकाची रक्कम श्रीमती तांदळे यांच्याकडून वसूल करण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अतिरक्ति देयकास तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तांदळे याच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. खुलासा न दिल्यास रक्कम वसुलीची कार्यवाही करण्यात येईल, अशी तंबी आयुक्त संजीव जैस्वाल यांनी दिली आहे. (प्रतिनिधी) ४
श्रीमती के. एस. तांदळे या सेवानिवृत्त आहेत.
४आयुक्तांची नोटीस आल्यानंतर त्यांना सीईओंमार्फत बजावण्यात आले मात्र १५ दिवसात खुलासा करणे आवश्यक असताना महिना उलटूनही त्यांनी खुलासा केलेला नाही.
४याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. ए. इनामदार म्हणाले, प्रकरण जुने आहे. आयुक्तांकडून आलेली नोटीस संबंधितांना दिलेली आहे.
४खुलासा प्राप्त होताच वरिष्ठांना सादर करण्यात येईल.