चित्रकला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
By Admin | Updated: September 26, 2016 00:39 IST2016-09-26T00:32:11+5:302016-09-26T00:39:49+5:30
औरंगाबाद : कॅम्पस क्लबतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्पनाशक्तीच्या जोरावर बालकांनी आकर्षक चित्रे रेखाटली.

चित्रकला स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
औरंगाबाद : कॅम्पस क्लबतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्पनाशक्तीच्या जोरावर बालकांनी आकर्षक चित्रे रेखाटली. शनिवारी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, एजीपी पब्लिक स्कू ल, लिटिल फ्लॉवर हायस्कूल, होलिक्रॉस स्कूल, चाटे स्कूल, जैन इंटरनॅशनल स्कू ल, दि वर्ल्ड स्कूल या ठिकाणी या स्पर्धा घेण्यात आल्या. रविवारी लोकमत हॉल येथे तसेच तनवाणी स्कूल येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. ५००० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.
सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजा रविवर्मा चित्रकला महाविद्यालयाचे संचालक उदय भोईर, प्राध्यापक महेंद्र खाजेकर, रोहित क्रिएटिव्ह क्लासेसचे संचालक रोहित गिरी यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते :
१. प्रथम गट (इ.१ ली व २ री)- प्रथम- विनय बागडे, द्वितीय- श्रेया धवणे, तृतीय- ओम खारकर, उत्तेजनार्थ- सृष्टी काळे, प्रांजली वाणी.
२. दुसरा गट (इ. ३ री ते ५ वी)- प्रथम- लरिल खान, द्वितीय- इश्मित काळे, तृतीय- अद्विती देशमुख, उत्तेजनार्थ- रूमैसा फातेमा, पलक पांडे
३. तिसरा गट- (इ. ६ वी व ७ वी)- प्रथम- यशिका नंदगवारे, द्वितीय- सुहानी पाठक, तृतीय- सृष्टी महाजन, उत्तेजनार्थ- अनन्या आठल्ये, कर्थिपन बाबू
४. चौथा गट (इ. ८ वी ते १० वी)- प्रथम- करिश्मा साहुजी, द्वितीय- साक्षी बागूल, तृतीय- सायली जामकर, उत्तेजनार्थ- प्रथम शेलार, पूर्वा मंत्री.