पीक विम्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
By Admin | Updated: July 11, 2014 00:59 IST2014-07-10T23:43:53+5:302014-07-11T00:59:37+5:30
जालना : राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत पीक विमा भरण्यास प्रशासनाने ३१ जुलै मुदतवाढ दिली आहे.

पीक विम्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
जालना : राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत पीक विमा भरण्यास प्रशासनाने ३१ जुलै मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी आपापले विमा प्रस्ताव पत्रक रोख रक्कमेसह जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या शाखेत ३१ जुलैपर्यंत भरणा करावेत, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी केले आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजना शेतकरी सभासदांसाठी फायदेशिर आहे. कर्जदार, बिगर कर्जदार, थकबाकीदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. पूर, चक्रीवादळ, भूस्सखलन, गारपीट या नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वैयक्तिक विम्याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऊस पिकाचा सुध्दा योजनेत समावेश करण्यात आला आहे. पावसाअभावी व नैसर्गिक आपत्तीमुळे संभाव्य पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण प्राप्त करुन घेण्याकरिता या योजनेत समील व्हावे असे आवाहन बँकचे अध्यक्ष टोपे यांनी केले. तालुका व महसूल क्षेत्रनिहाय पिकाचा विमा हप्ता व विमा प्रस्ताव आपापल्या नजिकच्या जिल्हा बॅँकेच्या शाखेत शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी ३१ जुलै २०१४ पूर्वी भरणा करावी, असे आवाहन टोपे यांनी असेही म्हटले आहे. (प्रतिनिधी)