विद्यमान नगराध्यक्षांना मुदतवाढ, इच्छुक नाराज
By Admin | Updated: June 24, 2014 00:40 IST2014-06-24T00:33:16+5:302014-06-24T00:40:50+5:30
हदगाव : विद्यमान नगराध्यक्षांच्या कार्यकाळास ६ महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेल्या नगरसेवकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे़

विद्यमान नगराध्यक्षांना मुदतवाढ, इच्छुक नाराज
हदगाव : विद्यमान नगराध्यक्षांच्या कार्यकाळास ६ महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेल्या नगरसेवकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे़
राज्यात पुढील चार-सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने महापौर, नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळास सहा महिन्याची मुदतवाढ दिली आहे़ हदगाव नगरपालिकेमध्ये १७ सदस्य असून त्यापैकी १५ सदस्य काँग्रेसचे असून २ सदस्य शिवसेनेचे आहेत़
येथील नगराध्यक्षाचा कार्यकाळ जूनमध्ये संपत आहे़ या महिन्यात २१ तारखेला तसा कार्यक्रम निवडणूक जाहीर होणार होता़ परंतु शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या कार्यकाळास सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे़
यापूर्वी अनुसूचित जातीच्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान श्रीमती अंजनाबाई सोनुले यांना मिळाला होता़ आता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून काँग्रेसचे बहुमत असल्याने हदगाव नगरपालिका पुन्हा काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार हे अगदी स्पष्ट आहे़
या मुदतवाढीमुळे पक्षश्रेष्ठीचा ताण कमी झाला असून विधानसभेचे काम या पदाच्या आश्ेने सर्वच संभाव्य उमेदवारांना करावे लागणार आहे़ या निवडीचा परिणाम विधानसभेवर निश्चित झाला असता किंवा विरोधकांनी तसे रान पेटविले असते़ या वृत्ताला उपविभागीय अधिकारी विवेक घाडके यांनी दुजोरा दिला़
जुगाऱ्यांना पकडले
मांडवी : उमरी बाजार येथील आरोपी तुळशीराम चौधरी व इतर ९ जणांना जुगार खेळतांना पोलिसांनी पकडले़ जमादार गुणवंत सलामी यांनी या प्रकरणाची फिर्याद नोंदवली़
परिसरात सुरु असलेल्या अन्य अवैध व्यवसायाकडेही पोलिसांनी ‘लक्ष’ द्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)