औरंगाबादेत आगामी पाच वर्षांत विमानसेवेचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 20:04 IST2018-03-30T20:04:34+5:302018-03-30T20:04:34+5:30

जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे.

Extension of the airline in Aurangabad over the next five years | औरंगाबादेत आगामी पाच वर्षांत विमानसेवेचा विस्तार

औरंगाबादेत आगामी पाच वर्षांत विमानसेवेचा विस्तार

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे. त्यामुळे स्थानिक राजकारण आणि प्रशासनाने योग्य पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. तरीही पाच वर्षांत विमानसेवेचा आणखी विस्तार होईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यकारी संचालक केशव शर्मा म्हणाले.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचा (हायमास्ट) गुरुवारी (दि. २९) उद्घाटन सोहळा केशव शर्मा यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांची उपस्थिती होती. यावेळी १०० फूट उंच राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. डी. जी. साळवे यांनी औरंगाबाद विमानतळाच्या इतिहासाची माहिती देऊन आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा महिनाभरात सुरू होणार असल्याचे सांगितले.  विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर जमीन अधिग्रहणाची कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ.  भापकर यांनी विमानतळाच्या विकासाबाबत शासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शरद येवले यांनी आभार मानले.

कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा
सध्या विमान कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा आहे. आगामी कालावधीत विमान कंपन्यांकडे ९०० विमाने येण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाड्यातून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्यास चालना मिळेल, असे केशव शर्मा म्हणाले. नवल किशोर राम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे  विमानसेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सध्या विमान कंपन्यांकडे विमानांचा तुटवडा आहे. आगामी कालावधीत विमान कंपन्यांकडे ९०० विमाने येण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाड्यातून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्यास चालना मिळेल, असे केशव शर्मा म्हणाले. नवल किशोर राम यांनी जिल्हा प्रशासनातर्फे  विमानसेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 
 

Web Title: Extension of the airline in Aurangabad over the next five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.