विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: September 3, 2014 00:03 IST2014-09-02T23:46:07+5:302014-09-03T00:03:51+5:30
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विशेष पीक संरक्षण मोहिमेमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे़

विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विशेष पीक संरक्षण मोहिमेमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे़ या मोहीमेंतर्गत विद्यापीठाचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांनी केले़
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने २ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या कार्यक्रमांतर्गत विशेष पीकसंरक्षण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ विस्तार शिक्षण संचालक डॉ़ बी़ बी़ भोसले, संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ़ डी़एल़ जाधव, कृषी विकास अधिकारी बी़ एस़ कच्छवे, प्राचार्य डॉ़ डी़ एऩ गोखले, प्राचार्य डॉ़ विलास पाटील, प्राचार्या विशाला पटनम्, डॉ़ उदय घोडके, प्राचार्य डॉ़ रोहिदास, डॉ़ पी़ एऩ सत्वधर आदींची उपस्थिती होती़
कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू म्हणाले, शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाची गरज परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलत असते़ मराठवाड्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वी कमी पावसामुळे चिंतेत होते़ आता पिकावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
त्यामुळे शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितल़े़ यावेळी प्रगतशील शेतकरी नरेश देशमुख, गिरीष पारधे, तालुका कृषी अधिकारी डी़ बी़ काळे, आत्माचे उपसंचालक अशोक काळे, डॉ़ एस़ जी़ जेठुरे यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक डॉ़ ए़ के़ गोरे यांनी केले़ सूत्रसंचालन उदय वाईकर यांनी केले़ कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)