सरकारच्या विकासकामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा
By Admin | Updated: November 2, 2015 00:17 IST2015-11-02T00:12:48+5:302015-11-02T00:17:34+5:30
लातूर : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला एक वर्ष झाले आहे़ या कालावधीत सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत़ या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी,

सरकारच्या विकासकामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा
लातूर : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला एक वर्ष झाले आहे़ या कालावधीत सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत़ या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी, अशा सूचना सर्वाजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी येथे केली़
भाजपाच्या वतीने भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब कांबळे होते़ मंचावर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, सुधीर धुत्तेकर, शैलेश गोजमगुंडे, मोहन माने, गुरुनाथ मगे, देवीदास काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारने वर्षभराच्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख योजना आणल्या आहेत. त्यातच जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक प्रकल्प, तलाव आणि नद्यामध्ये जलसाठा वाढला आहे. कांही गावांचा भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्नही सुटला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्या योजनांची अंमबलबजावणीही सुरु आहे. या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवावी, असेही देशमुख यांनी आवाहन केले. कार्यक्रमास गीता गौड, स्वाती जाधव, सुवर्णा यलाले, सुरेखा पाटील, डॉ़राणी पुंड, सुबोध बेळंबे, अनिल शिंदे, लक्ष्मण शिंदे, अमोल पाटील, वसंत मदने आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. (प्रतिनिधी)