छेड काढणाऱ्याची होणार हकालपट्टी

By Admin | Updated: July 20, 2016 00:30 IST2016-07-19T23:57:49+5:302016-07-20T00:30:18+5:30

लासूर स्टेशन : येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात सुरू असलेले गैरप्रकार आजही सुरूच आहेत. वर्गमैत्रिणीच्या वाढदिवसाची विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्याची महाविद्यालयातून

The expulsion of the victim will be removed | छेड काढणाऱ्याची होणार हकालपट्टी

छेड काढणाऱ्याची होणार हकालपट्टी


लासूर स्टेशन : येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात सुरू असलेले गैरप्रकार आजही सुरूच आहेत. वर्गमैत्रिणीच्या वाढदिवसाची विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्याची महाविद्यालयातून हकालपट्टी केली जाणार आहे. मंगळवारी ( दि.१९) सकाळी महाविद्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला.
मंगळवारी सकाळी येथील छत्रपती शाहू महाविद्यालयातील बारावीत शिकत असलेल्या प्रशांत वंजारे याने त्याच्याच वर्गातील विद्यार्थिनीला वाढदिवसानिमित्ताने भेटवस्तू देण्यासाठी तिचा वाढदिवस कधी आहे, अशी विचारणा तिच्या मैत्रिणीकडे केली. ही घटना त्या मुलीच्या भावाला कळताच त्याने महाविद्यालयात धाव घेतली.
यावेळी मनसेचे अण्णासाहेब जाधव, पँथर पार्टीचे पिटर सुतार, युवासेनेचे नितीन कांजुणे, विलास इंगळे यांनी घटनेबाबत काय कारवाई केली, अशी विचारणा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे केली. त्यावर प्राचार्य नायकवडे यांनी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आल्यानंतर सदरील विद्यार्थ्याला महाविद्यालयातून काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: The expulsion of the victim will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.