भंगार वेचणाºया मुलांनी केलेली घरफोडी १८ तासात उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:30 IST2017-10-06T00:30:37+5:302017-10-06T00:30:37+5:30
जागृत हनुमाननगर परिसरात घरफोडी करून सोने, चांदी, मोबाईल असा ३९,३०० रूपयांचा मुद्देमाल चोरणाºया चोरट्यांना भाग्यनगर पोलिसांनी १८ तासात अटक केली़ सदर चोरी भंगार, कचरा वेचणाºया विधी संघर्ष बालकांनी केल्याचे उघड झाले असून दोन महिलांना अटक केली आहे़

भंगार वेचणाºया मुलांनी केलेली घरफोडी १८ तासात उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जागृत हनुमाननगर परिसरात घरफोडी करून सोने, चांदी, मोबाईल असा ३९,३०० रूपयांचा मुद्देमाल चोरणाºया चोरट्यांना भाग्यनगर पोलिसांनी १८ तासात अटक केली़ सदर चोरी भंगार, कचरा वेचणाºया विधी संघर्ष बालकांनी केल्याचे उघड झाले असून दोन महिलांना अटक केली आहे़
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जागृत हनुमाननगर येथे राहणारे अविनाश योगाजी सक्करवाड यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला़ यामध्ये त्यांनी घरातील एक तोळे सोने, पाच तोळे चांदीचे दागिणे, ६८०० रूपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ३९ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला़ ही घटना ४ आॅक्टोबर रोजी सकाळी घडली़ यानंतर अविनाश सक्करवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला़ दरम्यान, भाग्यनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांनी पोउपनि उमाकांत उगले, सविता खर्जूले, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, बालाजी सातपुते, विलास कदम, रितेश कुलथे, सुमेध पुंडगे यांनी तपासास गती दिली़ सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून भंगार, कचरा वेचणाºया दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेवून चौकशी केली़ यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सदर चोरी केलेले सोने, मोबाईल हे सुरेखा शाहु नक्कलवाड (वय २०) व संगम नक्कलवाड (वय २४) यांच्याकडे दिल्याचे सांगितले़ त्यानंतर सदर महिलांचा पोउपनि चंद्रकांत पवार, सविता खर्जूले, पोकॉ वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, फैयाज पठाण यांनी शोध घेवून त्यांना अटक केली़ दरम्यान, त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला असून सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली केली़ सदर गुन्ह्याचा तपास चमकुरे हे करीत आहेत़