कनिष्ठ महाविद्यालयांचा वनवास संपणार

By Admin | Updated: August 30, 2014 00:01 IST2014-08-29T23:54:15+5:302014-08-30T00:01:56+5:30

हिंगोली : राज्यातील विनाअनुदानित परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग/ तुकड्यांचे आॅनलाईन प्रणालीद्वारे मूल्यांकन करण्यात येणार आहे

Expiration of junior colleges ends | कनिष्ठ महाविद्यालयांचा वनवास संपणार

कनिष्ठ महाविद्यालयांचा वनवास संपणार

हिंगोली : राज्यातील विनाअनुदानित परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग/ तुकड्यांचे आॅनलाईन प्रणालीद्वारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या शाळांना अनुदान देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ही कार्यवाही केली जात असून लवकरच या शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा वनवास संपणार असल्याची चिन्हे आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी करताना इंग्रजी शाळांशी जोडून असलेल्या वर्ग व तुकड्यांचा मात्र विचार होणार नाही. हे मूल्यांकन २0१३-१४ या वर्षातील अभिलेख्यांवर आधारित होणार आहे. यासाठीचे वेळापत्रकच शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे संचालक सर्जेराव जाधव यांनी काढले आहे.
त्यात २१ आॅगस्ट ते २0 सप्टेंबर या कालावधीत ६६६. ेंँङ्मिी२ीूङ्मल्लंि१८.ूङ्मे या संकेतस्थळावर आॅनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्यास सांगितले आहे. त्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत शाळांनी भरलेली ही माहिती चार प्रतींमध्ये माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे. ५ आॅक्टोबरला त्याच संकेतस्थळावर प्रस्ताव लोकांच्या हरकतींसाठी जाहीर होतील. २१ ते ३0 आॅक्टोबरदरम्यान पाक्ष शाळांच्या मूल्यांकनासह गुणदान होईल. १ नोव्हेंबरला पात्र व अपात्र शाळांची यादी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तर १२ रोजी पात्र शाळांची यादी शासनाकडे अनुदानासाठी सादर केली जाणार आहे.
२000 पासून या शाळांना अनुदानाची प्रतीक्षा होती. सुरुवातीला कायम विनाअनुदानित असल्याने मोठी पंचायत झाली होती. आता अनुदानापर्यंत पोहोचल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल शिक्षण संस्था महामंडळाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर मुळे व सरचिटणीस गजानन कुटे यांनी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे आभार मानले.

Web Title: Expiration of junior colleges ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.