जिल्ह्यातील ६०० शाळांतील बालवैज्ञानिकांचे प्रयोग सादर
By Admin | Updated: September 15, 2015 00:23 IST2015-09-14T23:40:53+5:302015-09-15T00:23:13+5:30
औसा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आलमला येथे आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात ६५६ पैकी ६०० शाळांतील बालवैज्ञानिकांनी आपले प्रयोग सादर केले आहेत़

जिल्ह्यातील ६०० शाळांतील बालवैज्ञानिकांचे प्रयोग सादर
औसा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आलमला येथे आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात ६५६ पैकी ६०० शाळांतील बालवैज्ञानिकांनी आपले प्रयोग सादर केले आहेत़ या प्रदर्शनास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे़
आलमला येथील विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निकमध्ये आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आ़ विक्रम काळे यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर होत्या़ यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सभापती कल्याण पाटील, माजी सभापती बालाजी कांबळे, जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब सवई, किसनराव लोमटे, जयश्री पाटील, रेखा तरडे, औसा पंचायत समितीच्या सभापती कोमल सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी डॉ़ गणपत मोरे, संजयकुमार राठोड, शिवचरण धाराशिवे, प्रभाकर कापसे, बसवराज धाराशिवे, महादेव खिचडे, डॉ़ महादेव पंडगे आदींची उपस्थिती होती़
यावेळी आ़विक्रम काळे म्हणाले, इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनामुळे विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे़ त्यामुळे संशोधन वृत्ती वाढत आहे़ यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते़