पंचेवीस लाख खर्च; इमारत धुळखात !
By Admin | Updated: August 9, 2014 00:34 IST2014-08-09T00:05:37+5:302014-08-09T00:34:47+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च करुन टोलेजंग इमारत उभी केली आहे

पंचेवीस लाख खर्च; इमारत धुळखात !
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च करुन टोलेजंग इमारत उभी केली आहे. मात्र हे काम पूर्ण होवून पाच महिन्याचा कालावधी लोटला असतानाही केवळ लाईट फिटींग अभावी ही इमारत धुळखात पडून आहे.
पारगावसह परिसरातील शेतकरी शेतीचा जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे पशुधन संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.या दवाखान्यांतर्गत पारगाव, जानकापूर, रुई, लोणखस, हातोला, आनंदनगर, पवार वस्ती, हिंगणी (खुर्द), हिंगणी (बु.) आदी गावे येतात. दवाखान्यात येणाऱ्या पशुधनांची संख्या लक्षात घेता, सुविधांची वानवा होती. तसेच इमारतही जुनाट झाली होती. डॉक्टरांना वास्तव्यासाठी निवासस्थाने नव्हती. दरम्यान, या सर्व बाबी लक्षात घेवून जिल्हा परिषदेने येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी २५ लाखाचा निधी मंजूर केला होता. या माध्यमातून टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. हे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. मात्र लाईट फिटींग झाली नसल्यामुळे सदरील इमारत धूळखात पडून आहे. याबाबत अभियंता के.बी. फाळके म्हणाले की, दवाखान्याची इमारत मुदतीत पूर्ण करण्यात आली आहे. लाईट फिटींगचे काम अपूर्ण आहे. यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. (वार्ताहर)