खर्च निरीक्षकांकडून उमेदवार प्रतिनिधींची झाडाझडती
By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-07T00:01:20+5:302014-10-07T00:14:41+5:30
परतुर : खर्च निरीक्षकांकडून खर्च दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची सोमवारी सात तास झाडाझडती घेण्यात आली, दरम्यान काही उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदीत अनेक त्रुटी आढळून आल्या.

खर्च निरीक्षकांकडून उमेदवार प्रतिनिधींची झाडाझडती
परतुर : खर्च निरीक्षकांकडून खर्च दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची सोमवारी सात तास झाडाझडती घेण्यात आली, दरम्यान काही उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदीत अनेक त्रुटी आढळून आल्या.
परतूर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर केंद्रीय खर्च निरीक्षक अजय श्रीवास्तव हे ६ रोजी आले होते. यावेळी तहसील कार्यालयात दुपारी २ च्या दरम्यान सर्व निवडणूक प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत उमेदवारांच्या खर्चाचे दप्तर तपासण्यात आले. दर निवडणुकीत उमेदवार मोघम व अंदाजे खर्च दाखल करायचे, मात्र या निवडणुकीत खर्चाच्या बाबतीत बरेच पाश आवळून काटेकोरपणे खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. ही बैठक रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करून त्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या.
खर्च लिखाण व मर्यादेचे पालन करण्याचे सांगण्याज आले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लोखंडे, मुख्य लेखा अधिकारी जे. बी. चव्हाण, कोषागार अधिकारी कल्याणराव औताडे, वरीष्ठ लेखा अधिकारी आर. एम. सोळूंके, निलेश नलावडे, सहा. खर्च अधिकारी एस. एम. देशपांडे, पी. व्ही. गवळी यांचा पथकात समावेश होता.