कार्यकारी अभियंत्याचे वेतन रोखले

By Admin | Updated: May 30, 2014 00:24 IST2014-05-29T23:36:21+5:302014-05-30T00:24:21+5:30

लातूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे बुधवारी खुद्द प्रशासनावरच त्यांच्या दालनाला सील ठोकण्याची वेळ आली़

The executive engineer's salary has been stopped | कार्यकारी अभियंत्याचे वेतन रोखले

कार्यकारी अभियंत्याचे वेतन रोखले

 लातूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सातत्याने गैरहजर राहत असल्यामुळे बुधवारी खुद्द प्रशासनावरच त्यांच्या दालनाला सील ठोकण्याची वेळ आली़ या घटनेनंतरही कार्यकारी अभियंता गुरुवारी जिल्हा परिषदेकडे फिरकले नाहीत़ त्यामुळे त्यांचे वेतन रोखण्याची कार्यवाही करण्यात आली आहे़ दरम्यान, त्यांचा पदभार उप कार्यकारी अभियंत्याकडे सोपविण्यात आला आहे़ जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यावेळी कार्यकारी अभियंता रेणुकादास चौधरी यांच्या गैरहजेरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे़ सातत्याने कोणाचा न् कोणाचा रोष ओढवून घेणार्‍या चौधरी यांना यावेळी मात्र ‘घरचाच आहेर’ मिळाला आहे़ कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याच्या मौखिक तक्रारी आल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांना याबाबत लेखी पत्र देऊन शिस्त पाळण्याची सूचना केली होती़ मात्र त्यानंतरही त्यांच्या हजेरीत फारसा फरक न पडल्याने बुधवारी प्रशासनाने चक्क कार्यकारी अभियंता चौधरी यांच्या दालनालाच सील ठोकून पंचनामा केला़ या प्रकारामुळे बांधकाम विभागाची पुरती नाचक्की झाली आहे़ चौधरी हे सातत्याने गैरहजर राहत असल्याने त्यांच्या सेवेची जिल्हा परिषदेला यापुढे आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने कालच स्पष्ट केले़ दरम्यान, गुरुवारीही चौधरी जिल्हा परिषदेकडे फिरकले नाहीत़ त्यामुळे त्यांचे वेतन रोखण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाने केली आहे़ त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात अहवाल तयार करण्यात येत असून, तो पूर्ण होताच सचिवांकडे पाठविण्यात येणार आहे़ तूर्तास रेणुकादास चौधरी यांच्याकडील पदभार उप कार्यकारी अभियंता मोमले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ दरम्यान, कार्यकारी अभियंता रेणुकादास चौधरी हे त्यांच्या वर्तणुकीमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत़ जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रनाला उत्तर देताना त्यांच्या कटाक्षावर खुद्द अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनीही चौधरी यांना फटकारले होते़ तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर कामाबाबत समन्वयाअभावी त्यांच्याच दालनासमोर एका ठेकेदारात व जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीमध्ये ‘फ्रीस्टाईल’ झाली होती़ कामे वेळेवर होत नसल्याबाबत तसेच त्यांच्या गैरहजेरीबाबतही जिल्हा परिषद सदस्यांनी वेळोवेळी प्रशसनाकडे मौखिक तक्रारी केल्या होत्या़ ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन चौधरी यांच्याबाबत यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत़ (प्रतिनिधी) मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शिस्त पाळण्याची सूचना करूनही कार्यकारी अभियंत्यांनी केले होते दुर्लक्ष सतत गैरहजर राहणार्‍या कार्यकारी अभियंत्याच्या सेवेची गरज नसल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे कारवाईबाबतचा अहवाल सचिवांकडे पाठविण्यात येणार अध्यक्षांनीही फटकारले होते

Web Title: The executive engineer's salary has been stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.