यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राची कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:36 IST2017-10-24T00:36:34+5:302017-10-24T00:36:34+5:30
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त अंकुशराव कदम यांची नियुक्ती केली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राची कार्यकारिणी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात मागील बारा वर्षांपासून अविरत कार्य करणा-या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त अंकुशराव कदम यांची नियुक्ती केली आहे.
संस्थेच्या अध्यक्षपदाची मागील बारा वर्षांपासून यशस्वीरीत्या धुरा सांभाळणारे उद्योजक नंदकिशोर कागलीवाल यांच्या विनंतीवरून या प्रतिष्ठानचे मुंबई अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विभागीय केंद्राच्या नवीन कार्यकारिणीची निवड केली. औरंगाबाद केंद्राच्या विभागीय कोषाध्यक्षपदी सचिन मुळे यांची फेरनियुक्ती करण्यात आली असून, नीलेश राऊत यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागीय केंद्राच्या कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. अजित दळवी, डॉ. श्रीरंग देशपांडे, बिजली देशमुख, डॉ. मकदूम फारुकी, सुनील किर्दक, प्रा. दासू वैद्य, विजय कान्हेकर, डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, नंदकिशोर कागलीवाल, आ. राजेश टोपे व मुकुंद भोगले हे या केंद्राचे सल्लागार असणार आहेत. नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या विभागीय संघटकपदी सुबोध जाधव, तर महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या विभागीय समन्वयकपदी रेणुका कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.